हवेली सहकारी बँक मर्या. मोशी संचालक मंडळ निवडणूकीत श्री नागेश्वर पॅनल विजयी
लोकवार्ता : रविवार (दि.१३) रोजी हवेली सहकारी बँक मर्या. मोशी संचालक मंडळाची निवडणूक झाली. या निवडणुकीत श्री नागेश्वर पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत.

संजय बोराटे, रमेश गायकवाड, सुरेश रामाणे, अक्षय आल्हाट, सखाराम बोऱ्हाडे, संतोष आल्हाट, प्रकाश बनकर, विजय सस्ते, निवृत्त बोराटे, संदीप आल्हाट, रामहरी हजारे, संदीप आल्हाट हे उमेदवार बहुमताने विजयी झाले आहेत.
त्याचबरोबर परमेश्वर आल्हाट, मनीषा कुदळे, मनीषा सस्ते, अमित इंगळे, संतोष गायकवाड हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. हि निवडणूक रविवारी (दि. १३) रोजी सावित्रीबाई फुले म. न.पा. शाळा मोशी (गावठाण) येथे झाली.