‘आरोग्यसंपन्न विद्यार्थी राष्ट्राची संपत्ती’
भोसरी विधानसभा मतदार संघाचे प्रथम आमदार विलास लांडे यांचे प्रतिपादन
लोकवार्ता : निरोगी शरीर ही आपल्या स्वत:च्या संपत्तीसोबत ती राष्ट्राची संपत्ती आहे. निरोगी राष्ट्र तेव्हाच बनू शकते जेव्हा राष्ट्रातील विद्यार्थी निरोगी असतील, असे प्रतिपादन भोसरी विधानसभा मतदार संघातील प्रथम आमदार विलास लांडे यांनी केले.

मोशी येथील नागेश्वर न्यू इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थांसाठी मोफत आरोग्य तपासणी हिमोग्लोबिन, व रक्तगट तपासणी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट यांनी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
अजित गव्हाणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापून विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी अजित गव्हाणे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष संदेश आल्हाट, शाळेच्या प्राचार्या वैशाली आल्हाट यांची मुख्य उपस्थिती होती . कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी नगरसेवक वसंत बोराटे, माजी नगरसेविका मंदा आल्हाट, श्रीमंत आल्हाट, संतोष बोराटे , प्रकाश गव्हाणे, राघू बनकर ,चंद्रकांत बोराटे, रंगनाथ आल्हाट, दत्ता जगताप , संगीता कोकने ,सुनीता लांडे ,पूनम वाघ, सरिता झिंब्रे, मेघा पवार, मनीषा गवळी, उषा पवार, पूनम भालेकर आदी उपस्थित होते.