“मविआ सरकार फक्त पोपटपंची करतं..”
चंद्रकांत पाटील यांनी महाविकस आघाडी सरकारवर निशाणा साधत दिला आंदोलनाचा इशारा.
पुणे | लोकवार्ता –
शेतकरी किंवा समाजाकडे लक्ष द्यायला महाविकास आघाडी सरकारकडे वेळ नाही. हे सरकार फक्त पोपटपंची करत असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केलीय. तसंच 1 नोव्हेंबर रोजी काळी फीत लावून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्याचं आवाहनही पाटील यांनी केलं आहे.
नैसर्गिक संकटांनी शेतकरी त्रस्त असताना मदतीऐवजी मविआ सरकार पोपटपंची करतंय. त्यामुळे राज्यात शेतकरी ,29 अस्वस्थ एसटी कर्मचाऱ्यांनीही आत्महत्या केल्यात. ST कर्मचारी, शेतकऱ्यांनो, आम्ही तुमच्यासोबत आहोत सांगून सरकारच्या निषेधासाठी सोमवार, 1 नोव्हेंबरला काळी फीत लावूया, असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांसह सामान्य जनतेला केलंय.

१ नोव्हेंबर रोजी १ लाख कार्यकर्ते काळ्या फिती लावून करणार अभिनव आंदोलन.
पूर अतिवृष्टी, आणि वादळामुळे नुकसान सोसावं लागणाऱ्या शेतकऱ्यांना ठाकरे सरकारने अल्प मदत केली आहे. त्याच्या निषेधार्थ येत्या 1 नोव्हेंबर रोजी भाजपचे एक लाख कार्यकर्ते काळ्या फिती लावून अभिनव आंदोलन करणार आहेत. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनाची घोषणा केली.
राज्यात गेल्या दोन वर्षांपासून वादळे, अतिवृष्टी, नापिकीमुळे भरडल्या गेलेल्या शेतकऱ्याच्या हातात सरकारी मदतीचा एक पैसादेखील पडलेला नाही. या सरकारने राज्यातील शेतकऱ्याची फसवणूक केली आहे.मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यास न्याय मिळालाच नाही, असा दावा उपाध्ये यांनी केलाय.