“हिंदू धर्म भुषण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पाद्यपुजन”
-बोऱ्हाडेवाडी मोशी पिंपरी-चिंचवड येथे Statue ऑफ हिंदुभूषण या छत्रपती संभाजी महाराज यांचे पाद्यपुजन आज दिल्ली येथे पार पडले.
दिल्ली।लोकवार्ता-
भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतुन साकारण्यात येणाऱ्या बोऱ्हाडेवाडी मोशी पिंपरी-चिंचवड येथे भव्य दिव्य Statue ऑफ हिंदुभूषण या छत्रपती संभाजी महाराज यांच्या सर्वात उंच अश्या पुतळ्याचे काम दिल्ली येथील कार्यशाळेत सुरु आहे. काम लवकरात लवकर पूर्ण होणार असून छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य दिव्य पुतळयाचे दर्शन आपल्या सर्वाना लवकरच घडणार आहे.

आज दि. १५ डिसेंबर २०२१ रोजी पाद्यपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी महेश लांडगे यांच्या सोबत माजी महापौर राहुल जाधव तसेच नगरसेविका सारिका बोऱ्हाडे, अश्विनी जाधव व सहकारी नितीन बोऱ्हाडे, संतोष जाधव, विनायक मोरे, सरपंच आबा घारे उपस्थित होते.
