“घरकुल चिखली येथे पार पडला “होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम”
-घरकुल येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांच्या वतीने आयोजित खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला.
चिखली । लोकवार्ता-
भोसरी विधानसभेचे मा.आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांच्या वतीने आयोजित होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम शनिवार दि.२७ नोव्हेंबर २०२१ रोजी सा.७ वाजता घरकुल मेन सर्कल चिखली प्राधिकरण पुणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

चिखलातील सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे व सरिता नेवाळे यांच्या वतीने आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमास भोसरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा.श्री. महेश दादा लांडगे ,शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पुजा ताई लांडगे, व सन्माननीय लोकप्रतिनिधी, भाजपचे सर्व पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली.

विजेत्यांना मिळाली आकर्षक बक्षीसे…
कार्यक्रमात १० लकी ड्रॅा विजेत्यांना सोन्याची नथ बक्षिसे देण्यात आली. त्यासह उपस्थित महिलांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून ४० लकी महिलांना पैठणी देखील देण्यात आली.त्यामध्ये विजेत्यांना प्रथम क्रमांक फ्रिज, द्वितीय क्रमांक कुलर, तृतीय क्रमांक मिक्सर, अशी बक्षिसे तसेच, शिवाय प्रत्येक सहभागी महिलेस आकर्षक भेटवस्तु देण्यात आल्या आहे. सर्व महिलांनी खेळात सहभागी होऊन या खेळाचा मनसोक्त आनंद घेतला.