“आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन”
पिंपरी| लोकवार्ता-
आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रकांतआण्णा तापकीर आणि रविराज चंद्रकांत तापकीर यांनी आयोजित केलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रम मोशी येथे पार पडला.या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला मा. आमदार महेश लांडगे,पूजाताई महेश लांडगे, मा महापौर नितीन काळजे , नगरसेविका विनया तापकीर, वंदना आल्हाट,व इतर मान्यवर यांनी उपस्थिती लावली.

हा कार्यक्रम संध्याकाळी ६ वाजता साधुराम मंगल कार्यालय मोशी येथे पार पाडण्यात आला असून महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात खेळात सहभागी होऊन बक्षिसे पटकावली.वॉशिंग मशीन सोबतच फ्रिज,ओव्हन,व पैठणी यासारखे अनेक बक्षिसे वाटप करण्यात आली.
मा.आमदार महेश लांडगे यांनी विजेत्या महिला भगिनींचा आदरपूर्वक सन्मान करून त्यांना बक्षीशे देण्यात आली.
