मोशीत रंगणार होम मिनिस्टरचा खेळ !
-आमदार लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम
-नगरसेवक लक्ष्मण सस्ते यांच्याकडून आयोजन
पिंपरी ।लोकवार्ता-
भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी क्रिडा समिती सभापती व विद्यमान नगरसेवक लक्ष्मण सस्ते यांच्यातर्फे ‘पुन्हा एकदा होम मिनिस्टर, खेळ खेळूया पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.२६) सायंकाळी नगरसेवक सस्ते यांच्या शिवाजीवाडी मोशी येथील निवासस्थानी हा सोहळा रंगणार असून यामध्ये पैठणी, सोन्याच्या दागिन्यांसह अनेक आकर्षक बक्षिसांची रेलचेल असणार आहे.
शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कोरोना नियमांचे तंतोतंत पालन केले जाणार आहे. कार्यक्रमात लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले असून लकी ड्रॉ स्पर्धेतील प्रथम सात विजेत्यांना आकर्षक ७ बक्षिसे देण्यात येणार आहेत. शिवाय प्रत्येक सहभागी महिलेस आकर्षक साडी भेट देण्यात येणार आहे. कार्यक्रमात विजेत्यांना प्रथम क्रमांकास सोन्याचे नेकलेस व पैठणी, दुसऱ्या क्रमांकास सोन्याचे कानातील दागिने, तिसऱ्या क्रमांकास सोन्याची अंगठी, चौथ्या क्रमांकाच्या विजेत्यास फ्रिज, पाचव्या क्रमांकाच्या विजेत्यास पिठाची गिरणी, सहाव्या विजेत्यास ओव्हन, तर सातव्या क्रमांकास असणाऱ्या विजेत्यास वॉटर प्युरिफायर यासह अनेक आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहे.

कोरोना काळात सामाजिक आर्थिक स्थिती बिकट असताना महिलांचे योगदान अतिशय महत्वाचे ठरले. लॉकडाऊन काळात महिलांना मात्र दुप्पट काम करावे लागत असल्याचे चित्र होते. मार्गदर्शक आमदार महेश लांडगे हे नेहमीच महिलेच्या विकासासाठी आग्रही असून माहिलावर्गासाठी अनेक भरीव कामे केली आहेत. यामुळे कोरोना काळातून सावरत असताना महिलांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी तसेच घरगुती कामातून त्यांना विसावा देऊन बक्षिसेही मिळवून देण्यासाठी रमेश परळीकर प्रस्तुत वहिनी पुन्हा एकदा होम मिनीस्टर या प्रसिद्ध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सस्ते यांनी सांगितले. तसेच अधिकाधिक महिलावर्गाने यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.