१२५ स्वच्छता कर्मचाऱ्यांचा रुपीनगर मध्ये सन्मान
पिंपरी।लोकवार्ता-
रुपीनगर येथील माजी नगरसेवक शांताराम बापू भालेकर यांच्या पुढाकाराने पालिकेच्या १२५ स्वच्छता कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देवून सन्मानित करण्यात आले.यावेळी स्वीकृत नगरसदस्य पांडुरंग भालेकर,डॉ.धनंजय वर्णेकर,रूपीनगर शिक्षण मंडळाचे सचिव शांताराम दगडू भालेकर,संचालक रमेश भालेकर,संचालक दशरथ जगताप,सोमनाथ मेमाणे,अशोक कोकणे, बंटी भालेकर,घारजाई माता ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरुण वाळुंजकर,सचिव बंडू राणे,उपाध्यक्ष गौतम मोकाशी,बाबुराव गाडे,हभप हरिभाऊ वैराट,आनंदा बोराडे,किरण पाटील,शिरीष उत्तेकर,राजेंद्र तापकीर,शरद गो.भालेकर,रामदास कुटे, रविराज शेतसंधी,सागर चव्हाण,सुलोचना भोज,वैशाली भालेकर,वैशाली चव्हाण,सुनील आमने,सागर लोळगे,तोसिफ मुलाणी,सिद्धेश्वरबाप्पा जाधव आदी मान्यवर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यांनी केलेल्या सत्कार्याचे कौतुक म्हणून या स्वच्छता दुतांचा भेट वस्तू देवून सन्मान करण्यात आला.दिवाळी निमित्ताने सत्कार केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद द्विगुणित झाला होता. यावेळी शांताराम बापू भालेकर म्हणाले की , ‘ कोरोना काळात या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जी स्वच्छतेच्या माध्यमातून जनतेची सेवा केली.त्यामुळे एवढ्या मोठ्या महामारीतही शहरातील नागरिकांचा इतर साथीच्या आजारांपासूनही बचाव झाला. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून करणे अत्यंत महत्वाचे होते.ती सेवा वाखाणण्याजोगी आहे.