मुंबईत पावसानंतर ‘जोवाद’ चक्रीवादळाचा धोका; हवामान खात्याचा अलर्ट !
–राजधानी मुंबईत संततधार पाऊस सुरू आहे. मंगळवार-बुधवारी दोन दिवस अवकाळी पावसाने राज्यभरात झोपडपून काढलं.
मुंबई ।लोकवार्ता-
राजधानी मुंबईत संततधार पाऊस सुरू आहे. मंगळवार-बुधवारी दोन दिवस अवकाळी पावसाने राज्यभरात झोपडपून काढलं. तर, रात्रीपासून पाऊस रिमीझम सुरु आहे. महाराष्ट्रातील मुंबई-पुणे आणि कोकणात 3 डिसेंबरपर्यंत पावसाचा इशारा, हवामान खात्याने जारी केला आहे. यासोबतच आता हवामान खात्याने ‘जोवाद’ चक्रीवादळाबाबत अलर्ट जारी केला आहे.
डिसेंबर महिन्यात अचानक आलेल्या पावसाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. त्यामुळे दक्षिण पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

केवळ महाराष्ट्रातच (Maharashtra) नव्हे, तर इतर राज्यातही अवकाळी पाऊस पडत आहे. कमी दाबामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता हवामान खात्याने ‘जोवाद’ चक्रीवादळाबाबत अलर्ट जारी केला आहे. हवामानातील बदलामुळे आज देशाच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 3 डिसेंबरला पावसाचे प्रमाण आणखी वाढणार आहे. त्यामुळे त्याचे चक्री वादळात रूपांतर होईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.