लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

“मावळातील प्रत्येक गोष्टींवर मी लक्ष ठेवून आहे”

शेतकऱ्यांना नुकसानीबद्दल शासनाद्वारे आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करणार -पार्थ पवार

पिंपरी। लोकवार्ता-
पिंपरी-चिंचवड आणि मावळच नाही, तर राज्यातील विविध प्रश्नी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते पार्थ पवार हे ट्विट करीत सबंधित यंत्रणांचे लक्ष त्याकडे वेधत असतात.नगर जळीतकांडानंतर त्यांनी पिंपरी-चिंचवड, पुणे शहरासह पुणे जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे ट्विट केले.दुसऱ्या ट्विटव्दारे मावळातील प्रत्येक गोष्टीवर मी लक्ष ठेवून आहे, असा इशारा देखील दिला. त्यातून ते गेल्या २०१९ च्या लोकसभेला मावळ मतदारसंघातून पराजित झाले असले, तरी तेथील समस्यांविषयी ते जागरूक असल्याचे व त्या सोडविण्यासाठी ते प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट झाले. तसेच, त्यांनी वरील इशारा कोणाला दिला, याची चर्चा मावळच नाही, तर पिंपरी-चिंचवडमध्येही सुरु झाली आहे.

मावळात राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार सुनील शेळके वगळता इतर कोणी सोशल मि़डियात व त्याव्दारे तरुणाईच्या संपर्कात असल्याचे दिसत नाही. पिंपरी-चिंचवडमधील पक्ष पदाधिकाऱ्यांना, तर, सोशल मिडियाचे वावडेच असल्याचे दिसून आले आहे. त्याविरुद्ध भाजपचे शहरातील दोन्ही आमदार फेसबुक, ट्विटरवर सक्रिय राहून तरुणाईच्या संपर्कात आहेत.

मावळ परिसरातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने झालेल्या शेतकरयांच्या मोठ्या नुकसानीबद्दल चिंता व्यक्त केली होती. चिंता व्यक्त करूनच ते थांबले नाहीत. कापणीला आलेला भात भिजल्याने हवालदिल झालेल्या बळीराजाला शासनाद्वारे आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर पुन्हा त्यांनी मावळातील रस्ते समस्येवर ट्विट केले. मावळातील शेतकऱ्यांना त्यांचा भाजीपाला मुख्य बाजारात विक्रीसाठी आणताना अंतर्गत रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रास होत आहे. त्यामुळे अपघात वाढले आहेत. परिणामी पवन-अंदर मावळातील रस्त्यांसाठी डीपीडीसी फंडातून निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न करीत आहे, असे सांगत त्यांनी तेथील रहिवाशांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न काल केला.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani