लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

“…तोपर्यंत या सरकारला जगू देणार नाही”

मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवर अन्याय चालला आहे

लोकवार्ता । प्रतिनिधी

गुलाब चक्रीवादळामुळे हवामानात बदल होऊन त्याचा फटका महाराष्ट्राच्या अनेक भागांना बसला आहे. मराठवाड्यामध्ये लाखो हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. त्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पावसामुळे नुकसान झालेल्या भेट देत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नांदेडमधील चिवली आणि फुलवाल गावांना भेट दिली. सत्य परिस्थिती सरकारला समजावी आणि जेथे कमतरता आहे, तेथे त्या गोष्टींची पूर्तता व्हावी, यासाठी हा दौरा काढण्यात आला आहे असे पत्रकारांशी बोलताना म्हटले. त्यानंतर फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातील वांजरवाडा येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.

“भयानक अशा प्रकारची अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे खूप मोठं संकट शेतकऱ्यांवर आलं आहे. दौरा करताना विम्याचे, अनुदानाचे पैसे मिळत नाहीत, कर्ज वसुलीचा तगादा लावण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवर अन्याय चालला आहे. आपलं सरकार होतं तेव्हा नियमित विम्याचे पैसे द्यायचो. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याला ८०० कोटी रुपये दिले. आम्ही जोपर्यंत तुम्हाला मदत मिळत नाही तोपर्यंत या सरकारला जगू देणार नाही. या सरकारच्या पाठीमागे लागू. हे सरकार झोपलेलं आहे. या सरकारला जागे करण्याकरता आम्ही निघालो आहोत. जो पर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरचा संघर्ष सुरुच ठेवू,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

त्यानंतर सोमवारी दसऱ्याच्या आधी शेतकऱ्यांना मदत द्या, अशी मागणी फडणवीस यांनी राज्य सरकारकडे केली आहे. मांजरा धरणारे दरवाजे योग्य पद्धतीनं उघडले गेले होते का? असा सवाल उपस्थित करत फडणवीस यांनी याच्या चौकशीची मागणी केली आहे. आम्ही केंद्र सरकारच्या निकषाबाहेर जाऊन शेतकऱ्यांना मदत केली होती. राज्य सरकारनं आही मदत द्यावी त्यानंतर केंद्राकडून पैसे घ्यावेत, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे गेल्या तीन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीची पाहणी करत आहेत. अतिवृष्टीची माहिती घेत फडणवीस प्रत्यक्ष शेतीची पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी सामनामधून करण्यात आलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे गेल्या तीन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीची पाहणी करत आहेत. अतिवृष्टीची माहिती घेत फडणवीस प्रत्यक्ष शेतीची पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी सामनामधून करण्यात आलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani