“बैलगाडा सुरू झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही”- आमदार महेश लांडगे
भोसरी | लोकवार्ता-
बैलगाडा शर्यत बंदी उठविण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या अपीलावर आजपासून सुनावणी सुरु झाली. उच्च न्यायालयातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. पुढील आठवड्यात इतर राज्यांचे म्हणणे ऐकून घेऊन पुढचा निर्णय दिला जाईल, अशी सकारात्मक गोष्ट आजच्या सुनावणीत दिसून आली. यामुळे नक्कीच पुन्हा महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती सुरु होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या असल्याचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

४ वर्षापासून प्रलंबित असलेला शेतकऱ्यांच्या अस्मितेचा विषय म्हणजे बैलगाडा याची अखेर सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे दरम्यान आपल्या पक्षातील वकिलांनी बाजू मांडत आपली बाजू भक्कम मांडली असून लवकरात लवकर आपल्या बाजूने सकारात्मक निकाल न्यायव्यवस्था सूनावेल याची खात्री आहे .
“इतर राज्यातील जलिकट्टू ,बैलगाडा सुरू होतात मग तिथे प्राणी असुरक्षित नाहीत का ” असा खडा सवाल उपस्थित करत बाजू मांडण्यात आली आहे. न्यायाधीशांनी लवकरच याचा छडा लावून सकारात्मक भूमिका घ्यावी अशी सर्व बैलगाडा मालक तसेच भाजप आमदार महेश लांडगे यांनी विनंती केली आहे.