पोलिसांनी तक्रार न नोंदवल्यास थेट व्हाट्सअप वर आपली तक्रार नोंदवा
-पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांची अनोखी शक्कल.
पिंपरी । लोकवार्ता
स्थानिक पोलिसांनी दखल न घेतल्यास थेट व्हॉट्सअॅप करा, असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे. या बाबत सर्व पोलीस ठाण्यांत मोबाईल क्रमांकांचे फलक देखील लावण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची २० एप्रिल रोजी मुदतपूर्व बदली झाली. त्यांच्या जागी अंकुश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सुरुवातीला पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखेच्या कामगीरीचा आढावा घेतला. यांनी पोलिस कोणत्याही आमिषाला बळी पडू नये.

तसेच, यापुढे लाचलुचपत दरम्यान, शिंदे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विभागाने छापा मारल्यास संबंधित प्रभारी अधिकाऱ्याला (विभाग प्रमुख) जबाबदार धरण्यात येईल, अशा स्पष्ट शब्दात तंबी दिली आहे. आयुक्तांच्या या आदेशामुळे खळबळ उडाली असताना आता त्यांनी व्हॉटसअप क्रमांक जाहीर केला आहे. तसेच प्रत्येक पोलिस ठाण्यात मोबाईल क्रमांक नमूद असलेला फलक देखील लावण्यात आला आहे. त्यामुळे आता स्थानिक पोलिसांनी दाद न घेतल्यास तक्रारदारांना थेट पोलिस आयुक्त कार्यालयात व्हॉटसअॅप मेसेजवर आपली तक्रार मांडता येणार आहे. पोलिस अंकुश शिंदे यांनी व्हॉट्सअॅप क्रमांक जाहीर केल्याने प्रभारी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणल्याचे चित्र आहे.