पिंपरी- चिंचवड अग्निशमन विभागात कर्मचाऱ्यांच्या नियमबाह्य नियुक्त्या
लोकवार्ता : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अग्निशमन विभागाच्या नऊ कर्मचाऱ्यांची मोशी उपअग्निशमन केंद्रात ९ कर्मचाऱ्यांची नियमबाह्यपणे नेमणुका करण्यात आल्या आहेत. ठराविक व मर्जीतील कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी बदली देण्यात आली आहे. त्यामुळे इतर पात्र कर्मचान्यांमध्ये रोष पसरला आहे. त्या बाबत आयुक्तांनी चौकशी करून तो आदेश रद्द करावा, अशी मागणी होत आहे.

अग्निशमन विभागाचे काम अत्यंत तातडीचे व जोखमीचे असते. कोणती घटना कधी घडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे केंद्राच्या जवळच्या अंतरावर राहत असलेल्या कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्याचा नियम आहे.
नियुक्तीचा नियम तसेच, पात्र कर्मचाऱ्यांना डावलून आपल्या मर्जीतील व ठराविक कर्मचाऱ्यांना मोशी केंद्रावर नियुक्त केले आहे. ते कर्मचारी केंद्रापासून दूर अंतरावर राहतात. तसेच, मोशी केंद्र अद्याप सुरू झालेले नाही. असे असताना घाईघाईत मुख्य अग्निशमन अधिकारी गावडे यांनी सेवानिवृत्तीच्या अखेरच्या दिवशी या नियुक्तीच्या आदेशावर सही केली आहे. या नियुक्त्यांसाठी गावडे यांचे स्वीय सहायक विवेक खांदेवाड यांनी आर्थिक जुळवाजुळव केल्याची जोरदार चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. या नियमबाह्य नेमणुकांची आयुक्तांनी चौकशी करून तो आदेश रद्द करावा, अशी अपेक्षा पात्र कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
“अग्निशमन दलाच्या मोशी उपकेंद्रात झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबत माहिती घेऊन ती तपासली जाईल. त्या नियुक्त्या नियमानुसार झाल्या किंवा नाही हे पाहिले जाईल. त्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल.
(विजयकुमार थोरात, प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी )