जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबाबत महत्वाची बातमी!
-पालखी मुक्कामाचं इंदापूर ठिकाण बदलंलं.
पुणे । लोकवार्ता
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबाबत महत्वाची बातमी समोर येत आहे. संत श्रेष्ठ श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान लवकरच होणार आहे. त्यासाठी सर्व तय्यारी करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी शहरातील पालखी स्थळ व रिंगण सोहळा मैदानाची पाहणी केली. यावेळी तुकाराम महाराज पालखीचा पूर्वी पालखी मुक्काम हा नारायणदास हायस्कूल, इंदापूर येथे होता. परंतू या वर्षी आय. टी. आय. कॉलेज येथे होणार आहे. अद्यापही स्थळाबाबत बोलणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र पालखी स्थळ या वर्षी आयटीआय या ठिकाणीच असल्याचे स्पष्ट संकेत पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिले आहेत. त्यामुळे पालखी स्थळ बदलल्याने आता यावर इंदापूर शहरात वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत.

संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनरोजी देहूमधून प्रस्थान ठेवणार आहे. पालखीचा इंदापुरातील मुक्काम यावेळी बदलला आहे. विश्वस्त आणि महाविद्यालयाची बोलणी सुरू असल्याची माहिती विजय देशमुख यांनी दिली आहे. जो काही निर्णय होईल, त्याप्रमाणे प्रशासनाची तयारी असेल. असे ते म्हणाले तर पालखी मार्गावर काही ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत. पालखी जाण्यासाठी रस्ता चांगला करण्याचा प्रयत्न करत आहोत. पालखी तळावरची वाहने पहिल्यादा मार्गस्थ करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.