लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा; अजित पवार यांचा मोठा वाटा
-राजकारण बाजूला ठेवत थेट अमेरिकेतून मिळवून दिल इंजेक्शन.
पिंपरी । लोकवार्ता-
गेल्या काही दिवसांपासून चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे बाणेर येथील खासगी रुग्णालयात दाखल आहेत. अस्वस्थेमुळे गेल्या काही दिवसात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र ३ दिवसांपूर्वी अमेरिकेतून मागविण्यात आलेले इंजेक्शन दिल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. ते प्रतिसाद देवू लागले असून त्यांचे व्हेंटीलेटरही काढण्यात आले आहे. त्यामुळे हे इंजेक्शन म्हणजे त्यांच्यासाठी एकप्रकारे नवसंजीवनी ठरले आहे.

पण लक्ष्मण जगताप यांना हे इंजेक्शन मिळवून देण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची खूप मोठी मदत झाली अशी माहिती, आमदार जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी सरकारनामाला आज दिली. या इंजेक्शननंतर आमदार जगताप कालपासून प्रतिसाद देऊ लागले आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असली आणि ते उपचारांना प्रतिसाद देत असले, तरी त्यांना बोलण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे, असेही शंकर जगताप यांनी सांगितले.