कासारवाडीत अपघातात चिमुकल्याचा नाहक बळी; व्यंकटेशला न्याय देण्यासाठी युवानेता विश्वजीत बारणे यांच्या नेतृत्वाखाली उद्या महापालिका भवनासमोर आमरण उपोषण
लोकवार्ता : ऐन दिवाळीच्या काळात डोकडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. कासारवाडी येथे सुट्टीत गावी आलेल्या व्यंकटेश डोकडे या चिमुकल्याचा अपघाती मृत्यू झाला. अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्याचा नाहक बळी गेला. सदर घटना उलटून जवळपास एक महिना होत असून अद्यापही त्या निष्काळजी व बेजबाबदार अधिकाऱ्यांसह ठेकेदारावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.

यावरून असे लक्षात येते की, प्रशासन या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम करत त्यांची पाठराखण करत आहे. तरी या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी यासाठी पिंपरी चिंचवड युवासेना शहरप्रमुख विश्वजीत बारणे यांच्या नेतृत्वाखाली ७ नोव्हेंबर २०२२ रोजी पिंपरी चिंचवड महापालिका भवनासमोर आमरण उपोषण करणार आहेत.
चिमुकल्या निर्दोष व्यंकटेशला न्याय मिळवून देण्यासाठी पिंपरी युवा अधिकारी निलेश हाके, चिंचवड युवा अधिकारी माऊली जगताप, युवासेना शहर सनमवक रुपेश कदम, युवा सेना शहर संघटक राजेंद्र तरस, निखिल येवले, ऑंकार विनोदे, सागर बारणे, केदार चासकर, मंदार येळवंडे, रोहित माळी, नितीन पाटील, अविनाश जाधव, आशिष बाबर, सलमान सय्यद पटेल, निजाम शेख, विशाल भातआंब्रेकर, संग्राम धायरीकर, युवती सेनेच्या शर्वरी जळमकर, मनाली कुटे उपोषणास उपस्थित राहणार आहेत.