लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

नांदेडमधील देगलूर मध्ये काँग्रेसचा विजय

भाजपचा मोठ्या मतांच्या फरकाने प्रभाव करून काँग्रेस चा विजय.

नांदेड। लोकवार्ता-

नांदेडमधल्या देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवला आहे. काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी 41 हजार 933 मतांनी विजय मिळवला. आपला विजय हा महाविकास आघाडीचा विजय असल्याचं जितेश अंतापूरकर यांनी विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. जनतेने मला भरभरुन प्रेम दिलं, त्यामुळे आपला विजय झाल्याचं जितेश अंतापूरकर यांनी म्हटलं आहे.

देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. 14 टेबलर 30 फेऱ्यांची मतमोजणी झाली. पहिल्या फेरीपासूनच जितेश अंतापूरकर आघाडीवर होते. शेवटच्या फेरीअखेर अंतापूरकर यांना 1 लाख 8 हजार 840 मतं मिळाली. तर भाजपाच्या सुभाष साबणे यांना 66 हजार 907 मतं मिळाली. वंचितचे उमेदवार उत्तम इंगोले यांना 11 हजार 347 मतांवर समाधान मानावं लागलं.

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर देगलूरमध्ये पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत एकूण 12 उमेदवार रिंगणात होते, पण मुख्य लढत काँग्रेस, भाजप आणि वंचित बहुजन आघाडीत होती. काँग्रेसतर्फे जितेश अंतापूरकर भाजपतर्फे सुभाष साबणे आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे डॉ. उत्तम रामराव इंगोले निवडणूक रिंगणात होते.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani