लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

शेवटी बाप तो बापचं… डँशिंग महेश लांडगेंच्या अश्रूंचा बांध तुटला..! पहा विडिओ

मुलगी साक्षीच्या आठवणींचा विडिओ व्हायरल..!

लोकवार्ता।प्रतिनिधी

भोसरी : (दि. ७) : एखादा व्यक्ती वरवर कितीही कणखर आणि मजबूत दिसत असला तरीही आपल्या मुलीच्या आठवणींत कोणत्याही बापाचे मन हळवे होणे स्वाभाविक आहे. भोसरीचे डॅशिंग आमदार महेश लांडगे यांचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. आमदार लांडगे यांची कन्या साक्षी आणि उद्योजक नंदकुमार भोंडवे यांचे चिरंजीव निनाद यांचा विवाह अत्यंत साध्या पद्धतीने नुकताच आळंदी येथे पार पडला. त्यानंतर आपल्या मुलीच्या आठवणींत भावूक झालेले आमदार महेश लांडगे यांच्या अश्रूंचा बांध तुटल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

पहा विडिओ : https://www.facebook.com/watch/?v=777872826210399

व्हायरल विडिओमध्ये आमदार महेश लांडगे यांनी मुलगी साक्षी हिच्या आठवणींना उजाळा देत तीचे कौतुक केले आहे. शिवाय तिच्या नव्या आयुष्याला शुभेच्छा दिल्या आहेत. कन्यादान करताना उर भरून आल्याचे आमदार लांडगे यांनी सांगितले आणि ती आठवण सांगताना अक्षरशः त्यांना रडू कोसळले. पहाडासारखे मजबूत दिसणारे आमदार महेश लांडगे आपल्या लेकीच्या आठवणीत ढसढसा रडताना पाहून अनेकांच्या काळजाला स्पर्श झाला. विडिओ पाहणाऱ्या अनेकांनी स्वतःचे अनुभव व भावना या व्हिडिओच्या कमेंटद्वारे व्यक्त केल्या आहेत.

आमदार महेश लांडगे यांच्या फेसबुक पेज वरून हा विडिओ अपलोड केल्यानंतर दोन दिवसात सात लाखांहून अधिक लोकांनी हा विडिओ पहिला असून सध्या सर्वत्र या व्हिडिओबाबत चर्चा सुरु आहे. देशातील नामांकित यु ट्यूब पोर्टल व्हायरल इन इंडिया वरही हा विडिओ प्रसिद्ध करण्यात आला असून त्यालाही वाचकांची पसंती मिळत आहे. विविध माध्यमांतून आमदार लांडगे यांच्या हळव्या भावनांबद्दल प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

रे क्रिएशनचे समाजमाध्यमांतून कौतुक
भावनिक विषयांवर भाष्य करून प्रत्येकाला विचार करायला लावणाऱ्या रे क्रिएशन टीम ने आमदार महेश लांडगे यांच्या लेकीप्रतीच्या भावना शब्दबद्ध केल्याने त्यांचेही समाजमाध्यमांतून कौतुक होत आहे. एक कणखर आमदार हळवा बापही आहे या संकल्पनेतून त्यांनी आमदार महेश लांडगे यांच्या भावना व्हिडिओच्या स्वरूपात मांडल्या आहेत. मागील महिन्यात हि त्यांनी ‘होय, मीच जबाबदार’ या मथळ्याखाली कोरोनाकाळातील भयंकर परिस्थितीला आपण स्वतःच कसे जबाबदार आहोत हे परखडपणे सांगणारी चित्रफीत बनवली होती, त्याला समाजमाध्यमांमधून प्रचंड पसंती मिळाली. मागील वर्षी शहरातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दत्ता साने यांच्या कोरोनामुळे झालेल्या निधनानंतर त्यांच्या शरद पवार यांच्याबद्दलच्या भावना चित्रफितीद्वारे त्यांनी मांडल्या होत्या. रे क्रिएशनचे अविनाश आदक यांनी लिखाण करून शब्दबद्ध केलेली ती व्हिडिओही महाराष्ट्रभर तुफान व्हायरल झाली होती. त्यातच आमदार लांडगे यांच्या त्यांच्या कन्येप्रतीच्या मन हेलावून टाकणाऱ्या भावनांचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

जाहिरात, सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग आणि निवडणूक व्यवस्थापन अशा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या रे क्रिएशनचे अविनाश आदक, किरण जोगदंड, प्रमोद सस्ते, मनोज शिंगुष्टे आणि विश्वजित पाटील यांनी आजवर अनेक नामांकित उद्योजक तसेच राजकीय व्यक्तीमत्वांसाठी यशस्वी काम केलेले आहे. अभ्यासपूर्ण आकर्षक मांडणी, प्रचार प्रसार व आधुनिक साधनांचा योग्य वापर हि त्यांची खासियत आहे.

तुझं स्वतःच फुलणं ध्यानात ठेव

आमदार महेश लांडगे यांनी नववधू साक्षी हिला नव्या आयुष्यासाठी प्रेमाचा सल्लाही दिला आहे ते म्हणतात, ‘जमेल तसं शिकत रहा दुनियेच्या शाळेत. व्यवहाराच्या आडव्या-उभ्या धाग्यांबरोबर गुंफत रहा नाविन्यपूर्ण काहीतरी,, पण हे सगळं करत असताना तुझं स्वतःच फुलणं ध्यानात ठेव, फुलणं प्रत्येक फुलाचा अधिकार आहे आणि फुलवणं प्रत्येक मातीच कर्तव्य, फूल होऊन जगताना माती बनायला मात्र विसरू नकोस. अंधाराला घाबरणं सोपं असतं बाळा, पण दिवा लावणं अवघड असत. पण हे काम माझं बाळ तिच्या या पुढच्या आयुष्यात नक्कीच करेल हा मला विश्वास आहे. तुझ्या कल्पना, तुझी स्वप्न, तुझ्या भावना यांच्यावर जीवापाड प्रेम कर, पण तुझ्या सुजाण समंजस मनाची कवाडं कायम खुली ठेव, एखादं मंदिर कसं सर्वांसाठी खुल असतं अगदी तसंचं..

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani