ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत शहराध्यक्ष हटाव मोहीम
शहराध्यक्ष बदलणार अशी चर्चा तर आहेच पण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावर निर्णय घेतील आणि तो आम्हाला मान्य असेल-संजय वाघेरे
पिंपरी | लोकवार्ता-
तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना हटवण्याची जोरदार मोहीम पक्षात सुरू आहे. पक्षातील एका प्रबळ गटाने त्यासाठी उचल खाल्ली आहे. नको त्या उफाळून आल्याने राष्ट्रवादीचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकत्र्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. वेळी गटबाजी जवळपास सहा वर्षांपासून वाघेरे शहराध्यक्षपदावर आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी पालिका निवडणुका लढवू नये, असा मतप्रवाह असलेला गट त्यांना बदलण्यासाठी आग्रही आहे. वाघेरे यांना समर्थन देणारा गटही पक्षात सक्रिय आहे. वाघेरे हटावमुळे राष्ट्रवादीतील गटबाजीचे राजकारण पुन्हा सुरू झाले आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा दोन दिवसीय दौरा शहरात झाला, तेव्हा या घडामोडी वेगवान झाल्या होत्या. पक्षातील सर्व पदाधिकारी एकाच विशिष्ट समाजाचे आहेत, असा मुद्दा उपस्थित करून शहर कार्यकारिणीत बदल करण्याची विशेषतः शहराध्यक्ष बदलाची मागणी पवारांकडे करण्यात आली होती. मात्र, तेव्हा शरद पवारांनी कोणताही निर्णय घेतला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार हेच याबाबतीत निर्णय घेतील, असे त्यांनी सूचित केले.

अजितदादांनाही नेतृत्व बदल हवा आहे, असे वातावरण तयार करत वाघेरेविरोधी गटाच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. वाघेरे यांची पालिकेतील स्वहिताची कामे तत्काळहोतात, त्यामुळे ते भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेत नाहीत, असा आरोप या गटाने पवारांकडे अनेकदा केला असून नेतृत्वासाठी नव्या दमाचा चेहरा असावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर बदल केल्यास पक्षाचे नुकसान होईल. नव्या अध्यक्षाला कामाची घडी बसवण्यासाठी वेळ लागेल, असा युक्तिवाद करत वाघेरे यांनाच कायम ठेवण्याचा आग्रह त्यांच्या समर्थकांनी धरला आहे. शरद पवार तसेच अजित पवार यांच्याकडे पक्षाची वेगवेगळी शिष्टमंडळे या संदर्भात जात आहेत. या सर्व घडामोडींमुळे पक्षकार्यकर्ते मात्र गोंधळात पडले आहेत.