लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

हिवाळी अधिवेशनात विकास कामांबाबत तोडगा काढण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी मांडली लक्षवेधी सूचना

लोकवार्ता : पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सर्वच शहरातील गृहनिर्माण सोसायटींच्या समस्यांसंदर्भात नागपूर हिवाळी अधिवेशनात चर्चा होणार आहे. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी याबाबत तोडगा काढण्यासाठी लक्षवेधी सूचना मांडली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारकडून सोसायटीकारकांना दिलासा देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांनी शास्तीकर, प्राधिकरण बाधितांचा साडेबारा टक्के परतावा आणि सोसायटीधारकांच्या समस्या अशा एकूण तीन लक्षवेधी सादर केल्या होत्या. त्यापैकी शास्तीकर सरसकट माफीचा निर्णय राज् सरकारने जाहीर केला. आता साडेबारा टक्के परतावा आणि सोसायटीधारकांच्या समस्यांबाबत सरकारच्या निर्णयकडे पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सोसायटीधारकांचे लक्ष लागले आहे.

आमदार लांडगे म्हणाले की, काही विकसकांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चुकीची आरक्षणे आणि सुविधांची आमिषे दाखवली जातात. मात्र, प्रत्यक्षात तसे नसते. करारनामा आणि हमीपत्राप्रमाणे बांधकाम व्यावसायिक प्रत्यक्षात सुविधा देत नाहीत. पार्किंग, एसटीपी, वीज व्यवस्था, रस्ते, पाणीपुरवठा अशा अनेक बाबींमध्ये त्रूटी असतात. त्यामुळे परिणामी, बांधकाम व्यावसायिक आणि सदनिकाधारक असा वाद निर्माण होतो. हा वाद स्थानिक लोकप्रतिनिधींकडे येतो. त्यामुळे विकसिक किंवा सदनिकाधारक दोघांपैकी एकाचा रोष लोकप्रतिनिधींना सहन करावा लागतो. त्यामुळे सोसायटीधारकांच्या समस्या आणि वाद तात्काळ निकालात काढण्याबाबत ठोस उपाययोजना कराव्यात. याकरिता राज्य सरकारचे लक्ष वेधणार आहे.

प्रकल्पाच्या प्लॅनमध्ये मंजूर झाल्याप्रमाणे बांधकाम व्यावसायिक सदनिकाधारकांना सुविधा निर्माण करीत नाहीत. प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतला जातो. प्रकल्पाच्या नियोजित आराखड्यात बांधकाम व्यावसायिक सोईनुसार परस्पर बदल करीत असतात. त्याचा फटका सदनिकाधारकांना बसतो. गृहनिर्माण सोसायटी संस्थेकडे प्रकल्प हस्तांतरण करताना नियमांचे उल्लंघन केले जाते. त्यामुळे सदनिकाधारकांना फटका बसतो. याबाबत आमदार महेश लांडगे यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे. राज्यात पहिल्यांदाच एखादा आमदार विधानसभेत सोसयटीधारकांचे प्रश्न मांडणार आहे, ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani