लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

“अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात उदघाटनांचा धडाका”

-29 ठिकाणी पालक मंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन.

पुणे | लोकवार्ता-

महापालिका निवडणूक पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी 13 मार्च रोजी पुण्यात उद्घाटन कार्यक्रमांचा धडाका लावणार आहेत. त्यांच्या हस्ते एक, दोन, तीन नव्हे तर चक्क 29 ठिकाणी उद्घाटनांचा नारळ फुटणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या विविध कामांचे लोकार्पण अजित दादांच्या हस्ते होणार आहे. अगदी सकाळी सातपासून या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे या दिवशी अजितदादा काय बोलणार याकडे आत्तापासूनच लक्ष लागले आहे. सध्या येणाऱ्या काळात राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या अतिशय महत्त्वाच्या महापालिकांची निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आपली सारी ताकद पणाला लावली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे रविवारी पुण्यात कार्यक्रम आहेतच. सोबत भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्याही हस्ते विविध कामांचे उद्घाटन होणार आहे. फडणवीस यांच्या हस्ते पाच ते सहा कार्यक्रमांचे उद्घाटन होणार असल्याचे समजते. हे दोन्ही दिग्गज एकाच दिवशी पुण्यात असल्यामुळे ते काय बोलतात, एकमेकांविरोधात आक्रमक भूमिका घेतात का, हे पाहावे लागले. काहीही असो. मात्र, पुण्यात होळी आधीच रविवारी राजकीय धुळवड रंगलेली पाहायला मिळणार आहे.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani