‘आयकर विभागाचा’ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मामेभावाच्या घरी छापा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर वारंवार ईडी च्या कारवाया सुरु आहे,यातच पुन्हा एकदा त्यांच्या मामेभावाच्या पुण्यातील घरी ईडी ने छापा टाकला आहे.
पिंपरी|लोकवार्ता-
राज्यात पुन्हा ED आणि IT कडून कारवाई करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी ईडीचा छापा मारण्यात आला आहे. दौंड शुगरचे संचालक जगदीश कदम यांच्या पुण्यातल्या घरी झडती घेण्यात येत आहे. त्याचवेळी राज्यातील अग्रगण्य बुलडाणा अर्बन पतसंस्थेवर आयकर विभाग अधिकाऱ्यांनी चौकशी सुरु केली आहे.

आयकर विभाग अधिकाऱ्यांच्या छाप्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी EDचा छापा मारण्यात आला आहे. याआधी अजित पवार यांच्या नातेवाईकांची सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू करण्यात आली होती. कोल्हापूर, पुणे, बारामती, अहमदनगरमध्ये छापेसत्र सुरु होते. चौकशीत मोठे पुरावे मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र हि माहिती अद्यापही समोर आलेली नाही. अजित पवार यांच्या नातेवाईकांवर छापेसत्र सुरु असल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी केंद्र सरकारवर निशाणा देखील साधला आहे.