इंडियन आयडॉल १२ फेम पवनदीप आणि अरुणिता पुन्हा येतायत प्रेक्षकांच्या भेटीला .
इंडियन आयडॉल १२ शो दरम्यान, पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल याची जोडी होतेय वायरल.
लोकवार्ता २० ऑक्टोबर,
इंडियन आयडॉल फेम पवनदीप आणि अरुणिता याची जोडी चाहत्यांना खूपच आवडली आहे. मध्यंतरात दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याचेही समोर आले होते. परंतु याचा आता खुलासा झाला आहे. पवनदीप आणि अरुणित यांनी त्यांच्या नात्याबद्दल स्पष्ट सांगितलेला आहे कि त्यांच्यात मैत्रीशिवाय अजून कोणतेही नाते नाही ये.

इंडियन आयडॉल नंतर आता पाठोपाठ त्यांच नवीन गाणं “ओ संयोजि” या गाण्याला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम भेटल आहे .आता या गाण्यानंतर त्याचा अजून एक नवीन गाण “मंजूर दिल” हे गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समोर आलंय . नुकताच या गाण्याचा टीसर लाँच झाला असून गाणं देखील लवकरच रिलीस होणार आहे. पवनदीप आणि अरुणिता यांनी २० गाणी साइन सुद्धा केली आहे .या गाण्याच्या पाठोपाठ ती गाणी सुद्धा लवकरच रिलीस केली जाणार असल्याचं गाण्याचे दिग्दर्शक व निर्माते राज सुरांनी यांनी स्पष्ट केलं आहे.