लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

“ऑक्टोबरमध्ये जीएसटीची विक्रमी वसुली”

ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलनात सर्वाधिक २४ टक्क्यांनी वाढ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती.

पिंपरी| लोकवार्ता-

सरकारकडून आज(१ नोव्हेंबर २०२१) जीएसटी संकलनाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.आकडेवारीनुसार ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक वसुली झाली आहे. भारतात जीएसटी लागू झाल्यानंतर एवढा कर जमा होण्याची ही दुसरीच वेळ आहे. आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२१ मध्ये १.३ लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऑक्टोबरमध्ये २४ टक्के अधिक कर जमा झाला आहे. करोनाच्या रुग्णसंख्येत घट,याचा परिणाम जीएसटी संकलनावर स्पष्टपणे दिसून येत आहे.

सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, यावेळी १,३०,१२७ कोटी रुपये जीएसटी म्हणून प्राप्त झाले आहेत. त्यापैकी सीजीएसटी २३,८६१ कोटी रुपये, एसजीएसटी ३०,४२१ कोटी आणि आयजीएसटी ६७,३६१ कोटी रुपये आहे.

जीएसटी लागू झाल्यानंतर वर्षभरातील हा दुसरा उच्चांक आहे. या वर्षी एप्रिलमध्ये ते १.४ लाख कोटी रुपये होते जीएसटीच्या रुपात जमा झाले होते. यापूर्वी सप्टेंबरमध्ये जीएसटी संकलन १,१७,०१० कोटी रुपये होते. ऑगस्टमध्ये जीएसटी संकलन १,१२,०२० कोटी रुपये आणि जुलैमध्ये १.१६ लाख कोटी रुपये होते. जूनमध्ये, जीएसटी संकलन एक लाख कोटी रुपयांपेक्षा कमी म्हणजेच ९२,8८४९ कोटी रुपये होते. मे महिन्यात ते ९८,००० कोटी रुपये होते. आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये जीएसटी संकलन १.४१ लाख कोटी रुपये होते.देश्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करत दिली माहिती.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani