इंद्रायणी नव्हे तर हिमनदी ? #indrayaniriver
लोकवार्ता : पिंपरी चिंचवड पालिका हद्दीतून तसेच इंद्रायणी नदी काठच्या गावातून, कारखान्यातून इंद्रायणी नदीत मैलामिश्रित रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडत असल्याने सलग दोन दिवस आळंदी येथील नदीपात्र मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त सांडपाण्यामुळे फेसाळले आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीच रूप हिमनदी सारखे दिसत आहे. हि चिंताजनक बाबा असून यावर लवकरात लवकर महापालिकेमार्फत तोडगा काढणे गरजेचे आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात येथील नदीपात्र रसायनयुक्त सांडपाण्यामुळे फेसाळलेले आहे. नदीकाठच्या गावातून पालिका ग्रामपंचायत कुठलीही मैलामिश्रित सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते सांडपाणी नदीपात्रात सोडतात. तसेच काही कारखानदार सुध्दा त्यांच्या कारखान्यातील रसायनयुक्त पाणी हे शुध्द होण्यासाठी असणारी, प्रक्रिया न करताच ते रसायनयुक्त पाणी तसेच नदीपात्रात सोडत असल्याने इंद्रायणी नदीने सद्यस्थितीत गटारीचे रूप धारण केले आहे. कंत्राट मिळविण्यासाठी कंपनीवर दबाव आणणाऱ्यांवर गुन्हा या नदी पात्रातील मैलामिश्रित रसायनयुक्त पाण्याने जलचर जीव सृष्टी धोक्यात आलीच आहे. परंतु हे नदीपात्रातील मेलामिश्रित रसायनयुक्त पाणी शेती पंपाद्वारे शेतात नेऊन पिकांना दिले जाते. त्या पिकांवर व ती पिके खाणाऱ्या मानवासह इतर पशु पक्ष प्राण्यांवर दुरोगामी दुष्परिणाम होऊन अनेक रोगांना ते बळी पडतात.
अशा पाण्यात स्त्रान केले तर त्वचा रोग संभवतात. या नदीपात्रातील पाणी पूर्णपणे प्रदूषित झाल्याने हे पाणी पिण्यास शासनानेच मनाई केली आहे. या जलप्रदूषणाच्या नदी काठी,जवळ असणाऱ्या विहिरी ,कुपनलिकांच्या पाण्यात सुद्धा दुष्परिणाम होत आहेत .हे नदी पात्रातील जलप्रदूषण पाहिल्यानंतर अनेकांनी त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.