देशात चुली विझत असताना…महागाई वरून राऊतांचा मोदींवर निशाणा.
देशात महागाईशी लढत असताना पंतप्रधान स्वतःसाठी विमान घेऊच कास शकतात-शिवसेना खासदार संजय राऊत.
पिंपरी। लोकवार्ता –
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देशातील वाढती इंधन दरवाढ आणि महागाईच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केलाय. महागाईचा भडका उत्साह जाळून टाकत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. दिवाळी आली काय आणि नाही आली काय आतषबाजी कमी आणि फटाकेच जास्त फुटत असतात.

राऊत म्हणाले, “एक-दुसऱ्याच्या घरात माचीसच्या काड्यांचे अदान-प्रदान होत असे.ती माचीसही महाग झाली. तेव्हा मला अश्मयुगातील माणूस आठवला. तेव्हा अग्नी कसा निर्माण करीत होते? दोन दगडांचे घर्षण करून अग्नी निर्माण केला होते जात . अयोध्येत राममंदिर निर्माण होतच आहे. त्यामुळे यानिमित्ताने नवे ‘रामराज्या’चेही दर्शन घडेल आणि ‘विकास’ म्हणजे काय तेसुद्धा लोकांना समजेल. विकासासाठी किंमत मोजावी लागते. ती किंमत पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीपासून माचीसच्या भाववाढीपर्यंत जनता चुकवीत आहे.”
महागाई असताना विशेष विमान आणि सेंट्रल व्हिस्टाच्या प्रकल्पावरून मोदींना टोला लगावला. ते म्हणाले, “माचीस महागण्याशी, खाद्यतेल, पेट्रोल-डिझेल भाववाढीशी या १८ हजार कोटींच्या खासगी विमान खरेदीचा संबंध जोडू नये. पंतप्रधानांच्या सोयीसाठी असे एक विमान असणे ही गरज आहे. पण माचीस, तेल, नोकऱ्या, पगार ही लोकांची ‘चैन’ झाली आहे, त्याचे काय? दिल्लीत २० लाख कोटी रुपये खर्च करून ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्प हट्टाने उभा केला जात आहे. त्यासाठी दिल्लीची शान खड्ड्यात मिळवली आहे.”