लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

“…महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहेत काय ?”

“अंमली पदार्थ तस्करी व सेवनाला कॉंग्रेसचा पाठींबा ?”

लोकवार्ता । प्रतिनिधी

अंमली पदार्थांच्या तस्करीवरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर नायनाट बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. “मुंबईत क्रुझवर सुरु असलेल्या पार्टीवर धाड टाकून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्याचं काम राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दलाच्या विशेष पथकाकडून करण्यात आलं. पण, मुंबईत अशा प्रकारे सर्रास अंमली पदार्थांची तस्करी व वापर होत असताना महाराष्ट्राचं अंमलीपदार्थ विरोधी पथक आणि गृहमंत्री झोपले आहेत काय?”, अशा कठोर शब्दांत अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह राज्य सरकारला सवाल केला आहे.

“आपली जबाबदारी ओळखून राज्यात वाढत चाललेली गुन्हेगारीची पाळंमुळं मुळासकट मोडीत काढण्याचं सोडून ठाकरे सरकार केवळ टक्केवारी वसुली करण्यात मग्न आहेत”, असाही आरोप यावेळी अतुल भातखळकर यांनी केला आहे. मुंबईसारख्या शहरात इतकी देशविघातक कृत्यं होत असताना राज्याचा गृह विभाग केवळ बघ्याची भूमिका पार पाडत आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने या विरोधात जोरदार कारवाई करणं अपेक्षित असताना गृह विभाग मात्र हॉटेल व बार मालकांकडून वसुली करण्यात धन्यता मानत असल्याची टीकाही भातखळकर यांनी केली आहे.

गृहमंत्री सुडाच्या राजकारणात मग्न !
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून मुंबईत गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे, दिवसाढवळ्या खून, बलात्कार, उद्योजक व राजकीय नेत्यांना खंडणीसाठी धमक्या देणं, अपहरण या आणि अशा गुन्ह्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. मात्र, राज्याचे गृहमंत्री हे केवळ सुडाच्या राजकारणात मग्न असल्यामुळे किमान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तरी मुंबईतील वाढत चाललेली अंमली पदार्थ व ड्रग्सची खुलेआम विक्री आणि गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष लक्ष द्यावं”, असा खोचक सल्ला भातखळकर यांनी दिला आहे.

“अंमली पदार्थ तस्करी व सेवनाला कॉंग्रेसचा पाठींबा?”
पुढे काँग्रेसवर टीका करताना भातखळकर म्हणाले की, “एनसीबीकडून टाकण्यात आलेल्या छाप्यात आर्यन खानसह अनेक युवकांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून हे सर्व युवक अंमली पदार्थांचं सेवन करत असल्याचं उघड झालं आहे. पण दुसरीकडे कॉंग्रेसचे नेते जयराम रमेश व इतर प्रवक्ते हे तर थेट आर्यन खानच्या बाजूने उभे राहत आहे. जणू यामार्फत ते अंमली पदार्थ तस्करी व सेवनाला कॉंग्रेसचा पाठींबा असल्याचं दाखवून देत आहेत.”

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani