जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाची तारीख जाहीर
ज्येष्ठ कृ. सप्तमी म्हणजेच २० जून २०२२ रोजी श्रीक्षेत्र देहूतील मुख्य मंदिरातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे होणार प्रस्थान.
देहू । लोकवार्ता-
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून हा पायी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला नव्हता. आता पुन्हा एकदा वारी होणार असल्याने हा सोहळा 20 जूनला देहूतून निघणार आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पायी पालखी सोहळा ज्येष्ठ कृ. सप्तमी म्हणजेच २० जून २०२२ रोजी श्रीक्षेत्र देहूतील मुख्य मंदिरातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. यासाठी संस्थानच्यावतीने पालखी सोहळा प्रमुखांची घोषणा करण्यात आहे.

पालखी सोहळा पंढरपूरला नेण्यात आला होता. पालखी सोहळा प्रमुख म्हणून देहू संस्थानचे विश्वस्त संतोष नारायण मोरे, विशाल केशव मोरे, माणिक गोविंद मोरे यांची निवड संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी जाहीर केली. या वेळेस संस्थानचे आली विश्वस्त संजय दामोदर मोरे, अजित लक्ष्मण मोरे व भानुदास अंकुश मोरे हे गेली दोन वर्षे कोरोनामुळे बसने उपस्थित होते.