“चंद्रकांत पाटील हल्ली झोपेतही बरळतात …”
चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेवर जयंत पाटलांचं प्रतिउत्तर.
पिंपरी| लोकवार्ता-
राष्ट्रवादी हा भरवशाचा पक्ष नाही. सकाळी एक, दुपारी एक आणि रात्री एक राजकारण करतात. एकवेळ काँग्रेस परवडली. काँग्रेसमधली सगळी व्यक्तिमत्वं सुसंस्कृत असतात, ते दरोडेखोर नसतात, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीवर केली होती. या टीकेवर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना विचारले असता “चंद्रकांत पाटील हे झोपेतही राष्ट्रवादीच नाव घेतात त्यांचे बोलणे तुम्ही मनावर का घेता”, असा टोला त्यांनी लगावला आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच २८ टक्के महागाई भत्त्यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून सुरू केलेले उपोषण गुरुवारी रात्री मागे घेतले. महागाई भत्त्याबरोबरच काही मागण्या मान्य झाल्याने एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने हा निर्णय घेतला. मात्र कृती समितीने घेतलेली भूमिका मान्य नाही, असं म्हणत सोलापुरात एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं. कृती समिती शासनासोबत डील करतं असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी सहकारमंत्री सुभाष देसाई पोहोचले होते. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.
“राष्ट्रवादी सोबत कधीही मैत्री करणार नाही अथवा त्यांच्या सलगी करण्यासाठीं त्यांच्या डावाला फसणार नाही-भाजप प्रदेशाध्यक्ष्य चंद्रकांत पाटील.”