पुणे शहराचे नाव बदलून जिजाऊनगर?
91 टक्के नेटीझन्सनी तीव्र विरोध
लोकवार्ता : पुणे शहराचे नाव बदलून जिजाऊनगर करा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. आणि या मागणीला 91 टक्के नेटीझन्सनी तीव्र विरोध केला आहे. मावळते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत औरंगाबादचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर पुण्याचे नाव जिजाऊनगर करण्याची मागणी काँग्रेसच्या मंत्र्यांनी केली.

पुण्याचे नाव बदलण्याबाबत काँग्रेसने केलेल्या मागणीबाबत 24 तासांत तब्बल 45 हजार 306 जणांनी आपापली मते नोंदवली आहेत. त्यापैकी 41 हजार 229 जणांनी पुणे शहराचे नाव बदलू नये किंवा नाव बदलण्याचा प्रश्नच येत नाही, अज्ञा अशयाची भूमिका मांडली आहे. या विषयावर मतप्रदर्शन करणाऱ्यांपैकी 4 हजार 077 जणांनी पुण्याचे नाव जिजाऊनगर करण्याच्या मागणीला समर्थन दिलं आहे. जिजाऊ नगर झालंच पाहिजे’,’हो! जिजाऊ आणि बाल शिवबा ने सोन्याचा नांगर हाकून पुणे शहर वसवलं..’, खूप छान आहे विचार करून बघावा साहेब धन्यवाद’,’जय जिजाऊ जय शिवराय’, केले पाहीजे’, अशा प्रकारची मतं समर्थकांकडून नोंदविण्यात आली.
पुण्याचे नाव बदलू नये अथवा पुण्याचे नाव बदलण्याचा प्रश्नच येत नाही, अशा प्रकारची भूमिका मांडणाऱ्यांच्या काही काही प्रतिनिधी म्हणतात, जिजाऊ हे महाराष्ट्राचे दैवत आहे, परंतु ‘पुणे’ हे नाव देखील मराठा साम्राज्याच्याच कालखण्डातील आहे. पुणे हे पुणेच आहे आणि असुदे…पुण्यनगरीमध्ये नका घुसवू राजकारण पुणे हे नाव कोणी मोगल,अफगाणी, मंगोल आक्रमक लुटारूंनी ठेवले आहे का? नसेल तर अट्टाहास कशाला हवा.
पुणे म्हणजे पुणे! जिजाऊ आणि छत्रपतींनी ठेवलेलं नाव आहे… फक्त पुणेच! आक्रमकांनी दिलेली नावे आधी बदलायला हवी कारण ती गुलामीची प्रतीक आहेत त्यामुळे औरंगाबादचं संभाजीनगर झालं हे योग्यच त्यासाठी अभिनंदन आहे, पण पुण्याचे नाव छत्रपती शिवरायाच्या काळातही तेच होतं . कुणीतरी आक्रमण करून ते बळजबरीने बदलेलं नाही. त्यामुळे काँग्रेसने यात राजकारण करू नये. नावापेक्षा विकास महत्त्वाचा आणि तो केवळ पुण्याचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा, सर्व जिल्ह्यांचा, नावं स्वतःची बदला, नाही ते रंग उधळू नका जिजाऊ आई व शिवराय यांचे फक्त पुणे, पुणेच! म्हणूनच असे नाव देण्याची मागणी करून नीच राजकारण करणारे व त्यांचे मित्र आता घरी निघाले आहेत.
इतिहासाची पान नीट उघडून पाहिली तर पुणे या शहराचं नाव ‘पुनवडी’ दिसत. त्याचा अपभ्रंश होऊन पुणे ‘पुणे’ हे नाव पडलं. त्यामुळे पुण्याचं नाव बदलण्याच्या मागणीला तीव्र विरोध होत आहे.