कडजाई माता कलशारोहण सोहळा उत्साहत पार
-आल्हाटमळा, मोशी येथे भक्तिपूर्ण वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.
मोशी । लोकवार्ता-
काल (दि.३ एप्रिल) आल्हाटमळा, मोशी येथील कडजाई माता मंदिराचा कलशारोहण सोहळा उत्साहात पार पडला. भक्तिपूर्ण वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या वेळी मंदिराची आकर्षक सजावट पाहायला मिळाली.महाआरती आणि देवींच्या गाण्याने हा सोहळा अभूतपूर्व झाला. यावेळी जेष्ठ व्यक्ती आणि महिलांनी उत्तम उपस्थिती दर्शवली.

याप्रसंगी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गणेशपूजन, कलश मिरवणूक, कलशारोहण, महाआरती आणि महाप्रसाद असे कार्यक्रम घेण्यात आले. श्रीदत्त भजनी मंडळाच्या भजनाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात भक्ताची अलोट गर्दी झाली. यावेळी भक्तांनी शांततेत दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. या आनंदोत्सवात अनेक दिगज्जांनी उपस्थिती दर्शवली.
