लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

दादरा नगर हवेलीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांचा दणदणीत विजय

दादरा नगर हवेलीत शिवसेनेचा ऐतिहासिक विजय; कलाबेन डेलकर यांच्याकडून महेश गावित पराभूत.

मुंबई। लोकवार्ता-

दादरा नगर हवेलीत लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी मोठ्या मतानी विजय मिळवला आहे. कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या परराज्याच्या पहिल्या खासदार आहे. दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर ही जागा रिक्त होती. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर डेलकर कुटुंबीयांनी भाजपावर आरोप केले होते. नंतर दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर आणि त्यांचे पुत्र अभिनव डेलकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला होता आणि शिवसेनेनं पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली होती.

कलाबेन डेलकर यांनी भाजपाच्या महेश गावित यांचा पराभव केला. कलाबेन डेलकर यांना १ लाख १६ हजार ८३४ तर भाजपाच्या महेश गावित यांना ६६ हजार १५७ मतं मिळाली आहेत. कलाबेन डेलकर यांनी भाजपाच्या उमेदवाराचा ५० हजार ६७७ मतांनी पराभव केला आहे.

आदित्य ठाकरेंनी ट्विट करत केलं अभिनंदन

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani