मोशीत महाआघाडीचा महावितरण विरोधात कंदील मोर्चा
धनंजय आल्हाट आणि अजित गव्हाणे यांनी केले नेतृत्व.

लोकवार्ता । प्रतिनिधी
मोशी : गेल्या काही महिन्यांपासून मोशी, जाधववाडी, डुडूळगाव या परिसरातील नागरिक वीजेच्या लपंडावाने प्रचंड हैराण झाले आहेत. महावितरणच्या या गलथान कारभाराला वैतागून आज मोशी विभागीय कार्यालयावर मोशीतील महाविकास आघाडीने मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. देहूरस्त्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली रिव्हर रेसिडेन्सी सोसायटी समोरील महावितरण कार्यालय येथे मोर्चाची सांगता झाली .
यावेळी मा.नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट, मा.स्थायी समिती अध्यक्ष नगरसेवक अजित गव्हाणे, मा.नगरसेवक अरूण बो-हाडे, मा.नगरसेविका मंदाताई आल्हाट,योगेश बोराटे ,संजय लडकत , रूपाली आल्हाट, विकास साने,कविता आल्हाट, आतिश बारणे, नितीन सस्ते, गणेश सस्ते, राहुल बनकर, संतोष बोराटे, दिलीप बो-हाडे,ज्ञानेश्वर बोऱ्हाडे, केदार गव्हाणे आशिष आल्हाट , मयूर कुदळे ,रोहित आल्हाट , गणेश आल्हाट व महाविकास आघाडीतील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मा.नगरसेवक धनंजय आल्हाट यांनी वीजेच्या अनियमितपणामुळे मोशी , जाधववाडी, डुडूळगाव परीसरात नागरीक, व्यावसायिक, लघुउद्योग यांना होणारा त्रास व अडचणी याविषयी महावितरण अधिका-यांना जाब विचारला. नगरसेवक अजित गव्हाणे यांनीदेखील वीज वितरण कंपनीकडून दुर्लक्ष केल्याबद्दल संताप व्यक्त केला.विकास साने, रूपाली आल्हाट यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले.
महावितरण उप अभियंता श्री कवडे व कनिष्ठ अभियंता श्री सुळ यांना निवेदन देऊन लवकरात लवकर याभागातील वीज पुरवठा नियमित होण्यासाठी स्वतंत्र सबस्टेशन उभारण्यात यावे अशी आग्रही मागणी करण्यात आली.सबस्टेशनसाठी जागा व इतर अडचणींवर येत्या आठवड्यात उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या सोबत बैठक घेऊन हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला जाईल असे आश्वासन महावितरण अधिकाऱ्यांनी दिले.