गायत्री स्कुलमध्ये कारगिल विजय दिवस साजरा
Lokvarta : कारगिल विजयाला २६ जुलै २०२० रोजी वीस वर्षे पूर्ण झाली. शाळा-शाळांमध्ये हा दिवस साजरा करुन विद्यार्थ्यांना या दिवसाची माहिती देण्यात येते. शाहिद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली जाते.
गायत्री इंग्लिश मिडीयम स्कूल मध्येही हा दिवस साजरा करण्यात आला.
सैनिकांविषयी बलिदान दिन गात आपली कृतज्ञता व्यक्त केली. तसेच विद्यार्थ्यांना कारगिल विजय दिनाचे महत्त्व सांगितले.

प्रमुख अतिथी मेजर बी. के. आढाव यांनी आपल्या भाषणात कारगिल युद्ध कसे लढले, काय-काय अडचणी आल्या, त्या अडचणीला सर्व जवान कसे सामोरे गेले आणि विजय प्राप्त केला अशी संपूर्ण कारगिल युद्धाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईल, टीव्हीपासून दूर राहावे व मैदानी खेळाकडे लक्ष द्यावे नियमित व्यायाम करावा अशा अनेक प्रकारचे मार्गदर्शन केले.
त्यानंतर निसर्ग संवर्धनासाठी शाळेमध्ये पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष आदरणीय श्री. विनायक भोंगाळे, सचिव श्री. संजय भोंगाळे, व्यवस्थापकीय संचालक सौ. कविता भोंगाळे कडू पाटील, विश्वस्त सौ. सरिता विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली भागवत,कार्यकारी संचालक सौ.काजल छतिजा, तसेच दोन्ही विभागाचे मुख्यध्यापक श्री. शशिकांत जोडवे व आर. गोविंद व सर्व शिक्षक उपस्थित हाेते.