‘सीता’ या भूमिकेसाठी करिना कपूर खान नको
ट्विटरवर #BoycottKareenaKhan ट्रेंड सुरु

लोकवार्ता।प्रतिनिधी
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री करीना कपूर खान सध्या चर्चेत आहे. ट्विटरवर #BoycottKareenaKhan ट्रेंड होताना दिसत आहे. या मागचे कारण म्हणजे ‘रामायण’ या पौराणिक कथेवर आधारित चित्रपटात करीना सीतेच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा. पण नेटकऱ्यांनी आता सोशल मीडियाद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ट्विटरवर #BoycottKareenaKhan ट्रेंड होताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी ‘रामायण’ या पौराणिक कथेवर आधारित चित्रपटात ‘सीता’ या भूमिकेसाठी निर्मात्यांनी करीना कपूर खानशी संपर्क साधल्याचे म्हटले जात होते. या भूमिकेसाठी तिला १२ कोटी रुपये मानधन म्हणून देण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. हे मानधन इतर चित्रपटांच्या तुलनेत जास्त असल्याचे म्हटले जात होते. या सर्व चर्चा सुरु असताना आता सोशल मीडियावर करीनाला ट्रोल करण्यात आले आहे. काहींनी करीनाला बॉयकॉट करण्याची मागणी केली. त्यामुळे ट्विटरवर #BoycottKareenaKhan ट्रेंड होताना दिसत आहे.
चित्रपटाचे लेखक विजेंद्र प्रसाद यांनी ‘स्पॉटबॉय’शी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘करीनाला चित्रपटाची ऑफर देण्यात आलेली नाही’ असे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी या चित्रपटामध्ये अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण राम आणि सीतेची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले होते. पण या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.