लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

कर्तव्यम सोशल फाउंडेशनचे कार्य म्हणजे सामाजिक बदलाची क्रांती : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

-कर्तव्यम प्रेरणा पुरस्कार सोहळा २०२२ राज्यपालांच्या हस्ते संपन्न

मुंबई | लोकवार्ता-

महाराष्ट्रभरात विविध ठिकाणी जनसेवेसाठी सदैव तत्परतेने कार्य करणाऱ्या कर्तव्यम सोशल फाउंडेशन चे कार्य नक्कीच प्रेरणादायी असून सामाजिक बदलाची जबाबदारी आत्मीयतेने आणि निस्वार्थ भावनेने ते पार पाडत आहेत. समाजात वावरत असताना माणूस म्हणून आपण समाजासाठी दातृत्वाची भूमिका सदैव ठेवायला हवी हीच शिकवण कर्तव्यम सोशल फाउंडेशनच्या कार्याच्या माध्यमातून दिली जाते असे प्रतिपादन महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी नुकताच राजभवन मुबई या ठिकाणी पार पडलेल्या कर्तव्यम प्रेरणा पुरस्कार सोहळा 2022 व क्रांतीकुमार महाजन लिखित द सुभाष सिक्रेट या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने केले.

या कार्यक्रमाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंग कोषारी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच कर्तव्यम सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष बारणे हे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष व कर्तव्यम सोशल फाउंडेशनचे सचिव क्रांतीकुमार महाजन हे संमेलनाध्यक्ष होते. यावेळी महाराष्ट्रभरातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या ३६ पुरस्कारार्थींचा राज्यपाल भगतसिंग कोषारी यांच्या हस्ते कर्तव्यम प्रेरणा पुरस्कार २०२२ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी कर्तव्यम सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष बारणे यांनी राज्यपाल भगतसिंग कोषारी यांचे स्वागत करून आभार व्यक्त केले.

यामध्ये उज्वलकुमार चव्हाण, डॉ. नेमजी गंगर, डॉ. शेख अख्तर हसन अली, डॉ. अलका नाईक, सूर्यकांत गोवळे, अशोक शिंदे, डॉ. सुनील चव्हाण, सागर कवडे, यशवंत कुर्वे, भास्कर अमृतसागर, मोहम्मद रियाझ शेख, रामू पागी, सुनील सिंग, दामोदर घाणेकर, वसंतराव धाडवे, प्रतिभा भिडे, डॉ. यतीन वाघ, डॉ. वर्षा देशमुख, भाऊसाहेब कोकाटे, डॉ. किशोर पाटील, डॉ. रमेश गोटखडे, यशपाल वरठे, डॉ. सुकन्या भट, डॉ. निलय जैन, बंडू मोरे, रामदास कोकरे, सोमनाथ वैद्य, प्रमोद धुर्वे, सुरेश कोते, डॉ. अनिल रोडे, रोशन मराठे, अविनाश आदक, जगन्नाथ शिंदे, अमित गोरखे, ज्योत्स्ना शिंदे पवार, आशिष श्रीनिवास व आरती सचदेव या महाराष्ट्रभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्याना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले. व रोशन मराठे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani