केतकी चितळे उच्च न्यायालयात; नुकसान भरपाई देण्याची मागणी
लोकवार्ता : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सोशल मीडियावर टीका केल्याने अभिनेत्री केतकी चितळे वादाच्या भोवऱ्यात सापडली. काही दिवसांपूर्वी तिला पोलिसांनी अटक केली होती. या वादानंतर तिच्याविरुद्ध आंदोलने झाली होती. तिच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे यासाठी विविध पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.

या सगळ्या तक्रारींची नोंद घेऊन एकत्रितपणे त्या गुन्ह्यांचा तपास पोलीसांनी सुरु केला आहे. आपल्याला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात केतकीने धाव॒ घेतली आहे.
यापूर्वी केतकीने उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती.आता एएनआयने केलेल्या व्टिटमध्ये तिनं पुन्हा उच्च न्यायालयामध्ये नव्यान सुटकेसाठी अर्ज केला आहे. त्यामध्ये पोलीसांनी केलेली अटक बेकायदेशीर असल्याचे तिने म्हंटले आहे. केतकीने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवरून विविध
राजकीय पक्षांच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. केतकी ही तिच्या वादग्रस्त पोस्टसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे.ती अभिनयापेक्षा तिच्या सोशल मीडियामुळेच जास्त चर्चेत असल्याचे दिसून आले आहे.