अभिनेत्री केतकी चितळेची फेसबुक पोस्ट व्हायरल । पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
लोकवार्ता : अभिनेत्री केतकी चितळेने केलेली फेसबुक पोस्ट व्हायरल झाली असून तिच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बदनामीकारक ट्विट केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्यासह तिच्या सहकारी वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिनेत्री केतकी चितळेने केलेली फेसबुक पोस्ट व्हायरल झाली असून तिच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बदनामीकारक ट्विट केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्यासह तिच्या सहकारी वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री केतकी चितळे आणि त्याच्या वकिलांनी फेसबुकवर शरद पवारांच्यावर मानहानीकारक मजकूर लिहून पोस्ट केली होती. ही पोस्ट पाहताक्षणी व्हायरल झाली. त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. तसेच समाजात तेढ निर्माण करण्याची कृती केल्याबद्दल भारतीय दंड विधान कलम ५०५ (२), ५००, ५०१, १५३, आयटी ACT कलम ७१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कविता संदेश आल्हाट यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
केतकीने शुक्रवारी फेसबुकवर पोस्ट टाकली होती. या पोस्टमध्ये तिने शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दात विधान केले होते. त्यांनतर मुंबई परिसरात तिच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी शनिवारी पुणे तसेच पिंपरी चिंचवड भागात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.