“आझाद मैदानावरील आंदोलनातून बाहेर पडण्याची खोत-पडळकरांची घोषणा”
आंदोलनाची पुढची भूमिका कामगारांनी ठरवावी – सदाभाऊ खोत
मुंबई।लोकवार्ता-
गेल्या १५ दिवसांपासून आझाद मैदानात सुरु असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आलं आहे. शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी याबाबत आज घोषणा केली आहे. मात्र, राज्यातील इतर जिल्ह्यात सुरू असलेले आंदोलन मागे घ्यायचे की नाही याचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी ठरवायचा आहे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी गेल्या १५ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी सुरु केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला भाजपनं पाठिंबा दिला होता
तर, गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानात कामगारांसोबत ठिय्या मांडला होता. सरकारने घेतलेल्या पगारवाढीच्या निर्णयानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. हे आंदोलन आहे ते राज्यातील एसटी कामगारांनी सुरु केलं आहे. आम्ही दोन लोकप्रतिनिधींनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. वेळेत पगार दिला पाहिजे, सातवा वेतन आयोगाप्रमाणं वेतन मिळालं, अशी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी होती. सरकारने याकडे लक्ष दिलं नव्हतं त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाची मागणी केली होती.

न्यायालयीन लढा वकील लढत आहेत तोपर्यंत सरकारने तोपर्यंत पगार वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहेहा पहिला टप्पा आहे. १७ हजारांपर्यंत पगार मिळणाऱ्या कामगारांना २४ हजारांपर्यंत पगार गेला आहे. ज्या कामगारांना २३ हजार मिळत होता. त्यांना २८ हजारांपर्यंत पगार मिळणार आहे. ही वाढ मूळ वेतनात होणार आहे. हा कामगारांच्या पहिल्या टप्प्यातील विजय आहे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार कमी पडणारी रक्कम देणार आहे. दोन पावलं सरकार पुढं आलं आहे. पहिला टप्पा जिंकलो आहे. न्यायालयातून जो निर्णय येईल. आम्ही दुसऱ्या टप्प्यात कामगारांनी आंदोलन केल्यास आम्ही त्यांच्यासोबत राहू. निलंबन आणि सेवासमाप्ती मागं करण्याचा निर्णय घेतला आहे. आज १२ पर्यंत कामगारांनी कामावर हजर व्हावं, असं अवाहन सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.