कृष्ण प्रकाश यांनी खंडणी मागणाऱ्याला केले जेरबंद .
-खंडणी उकळणाऱ्या एका आरोपीला पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश वेषांतर करून जेरबंद केले.
पिंपरी | लोकवार्ता-
सर्व सामान्य नागरिकांकडून खंडणी उकळणाऱ्या एका आरोपीला चक्क पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश वेषांतर करून जेरबंद केले आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि मुंबई पोलीस दलातील विश्वास नांगरे पाटील यांचा विश्वासू असल्याचे सांगून तो नागरिकांना खंडणी मागत होता. नेहमीच चर्चेत असणारे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्धी आणि पत्रकार परिषदापासून लांब होते.

परंतु, एका ऑडिओ क्लिपवरून खंडणी मागणाऱ्या आरोपीला वेषांतर करून पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश बेड्या ठोकल्या. त्यामुळे पुन्हा एकदा पोलीस आयुक्तांची चर्चा रंगली आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे प्रसिद्धीसाठी आटापिटा करत आहेत का, असा प्रश्न विचारला जात आहे.