आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना मिळाला रुग्णालयातून डिशचार्ज
आज आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची प्रकृती ठीक झाल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्यास सांगितले.

आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती ठीक झाली असून आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या दीड महिन्यांपासून आमदार लक्ष्मणभाऊ यांची तब्बेत बिघडली होती. त्यामुळे त्यांना बाणेर येथील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेली दीड महिने त्यांच्यावर उपचार चालू असल्याने महाराष्ट्रात चिंताजनक वातावरण निर्माण झाले होते. राज्यातील विविध पक्षातील नेते त्यांच्या तब्बेतीची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात येत होते.
भाऊंच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये ठाण मांडला होता. भाऊंची तब्बेत ठीक व्हावी यासाठी सर्व जाती-धर्मातील लोकांनी प्रार्थना केली होती. अखेर त्यांच्या प्रार्थनेला फळ मिळाले. आज आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची प्रकृती ठीक झाल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्यास सांगितले. त्यांना डिस्चार्ज मिळाल्याच्या बातमीने सर्व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच आमदार लक्ष्मणभाऊ घरी जातानाचा एक व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे.