विधान परिषदेच्या मतदानासाठी आमदार लक्ष्मण जगताप मुंबईकडे रवाना | lakshman jagtap
लोकवार्ता : आज विधान परिषदेचं मतदान मुंबईत होत आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार लक्ष्मण जगताप मतदानासाठी पुण्यात रवाना होत आहेत.
आज विधान परिषदेचं मतदान मुंबईत होत आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार लक्ष्मण जगताप मतदानासाठी पुण्यात रवाना होत आहेत. सकाळी मुक्ता टिळक रवाना झाल्या होत्या. राज्य सभेच्या निवडणुकीवेळी देखील लक्ष्मण जगताप आजारी असताना मतदानासाठी पोहचले होते. आणि आता पुन्हा एकदा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लक्ष्मण जगताप निघाले आहेत.

आपलं एक मत देखील लाख मोलाचं आहे, याच भावनेतून लक्ष्मण जगताप मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यातूनच त्यांची पक्षनिष्ठा दिसते. भाजपच्या ८० आमदारांच मतदान आता पूर्ण झालं आहे. लक्ष्मण जगताप विल चेअर वरून आता मुंबई च्या दिशेने निघाले आहेत. आपलं एक मत वाया जाऊ नये म्हणून त्यांनी आपलं कर्तव्य निभावलं आहे.