आमदार लक्ष्मण जगताप ठणठणीत… जुपिटर हॉस्पिटलमधून हात दाखवत चाहत्यांना प्रतिसाद
Lokvarta :आमदार लक्ष्मण जगताप ठणठणीत… जुपिटर हॉस्पिटलमधून हात दाखवत चाहत्यांना प्रतिसाद दिला. पिंपरी चिंचवड मधून मोठी बातमी समोर येतेय. पिंपरीकरांचे लाडके आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची प्रकृती ठणठणीत असून त्यांनी जुपीटर हॉस्पिटलमधून हात दाखवत चाहत्यांना प्रतिसाद दिला.
पिंपरी चिंचवड मधून मोठी बातमी समोर येतेय. पिंपरीकरांचे लाडके आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची प्रकृती ठणठणीत असून त्यांनी जुपीटर हॉस्पिटलमधून हात दाखवत चाहत्यांना प्रतिसाद दिला.

लवकरच पुन्हा एकदा लक्ष्मणभाऊ लोकांना भेटणार आहेत. एक महिन्यापूर्वी आमदारांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांनी बाणेर येथील जुपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल कऱण्यात आले. काही काळ त्यांना व्हेंटीलेटर लावण्यात आला होता. सर्व हालचाल मंदावल्याने सर्वांच्या जीवाला घोर लागला होता.उपचाराला त्यांचे शरिर प्रतिसाद देत असल्याने नातेवाईक आणि हितचिंतकांचा उत्साह वाढला.
आज सकाळी भाऊ थेट हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरूनबंद काचेच्या खिडकितून आपल्या चाहत्यांना हात दाखवला. त्यावेळी मोरया पावला, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. कदाचित आठवडाभरात भाऊंना घरी सोडण्यात येईल, असे त्यांचे धाकटे बंधू शंकर जगताप यांनी सांगितले. तसेच आमदार जगताप यांना लवकर बरे वाटू दे. यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी पुन्हा प्रार्थना सुरू केली आहे.