पिंपरी चिंचवड महासंघ निवडणुकीमध्ये स्वर्गीय शंकर (अण्णा) गावडे पॅनलचा दणदणीत विजय
-विजयी उमेदवारांच्या भावना अनावर.
पिंपरी | लोकवार्ता-
पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघ निवडणुक तब्बल 18 तासाहुन अधिक काळ सुरू असलेल्या मतमोजणीच्या निकाला नंतर स्वर्गीय शंकर(अण्णा) गावडे पॅनलचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंजूर्डे यांचा दणदणीत विजय झालेला आहे.
त्याच बरोबर याच पॅनलमधून उपाध्यक्ष पदासाठी निवडणुक लढविणारे मनोज माच्छरे हे देखील प्रचंड मतांनी निवडणूक आले तर याच पॅनल मधील इतर आठ उमेदवार देखील निवडून आल्याचं जाहीर करण्यात आलंय.

निवडणुक अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर करताच पॅनलच्या शेकडो समर्थकांनी एकच जल्लोष करत भंडारा उधळत आनंद व्यक्त केला यावेळी विजयी उमेदवारांच्या भावना अनावर झाल्याने त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असल्याचं बघायला मिळालं
एकूणच मतदारांनी पुन्हा एकदा स्व.शंकर (अण्णा) गावडे पॅनलला पसंती दिले असून हा विजय मतदार आणि पॅनल मधील सर्व उमेदवारांचा असल्याच सांगत कामगार महासंघाचे नवनिर्वाचित अद्यक्ष बबनराव झिंजुर्ड यांनी सर्वांचे आभार मानले.