मोशीतील गरजूंना वर्षभर मोफत किराणा साहित्य वाटपाचा शुभारंभ
कोरोना महामारीमुळे देशात हाहाकार पसरून अनेकांना एक वेळ जेवणही मिळणे कठीण झाले आहे.

लोकवार्ता । प्रतिनिधी
मोशी : शिवसेना भोसरी विधानसभा महिला आघाडी संघटिका सौ.रुपाली परशुराम आल्हाट व परशुराम भाऊ आल्हाट यांच्या संकल्पनेतून कुटुंब कार्ड योजना अंतर्गत मोशी प्रभागातील ५००० गरजू कुटुंबाना दर महिन्याला १ वर्षभर अन्नधान्य किटचे वाटप करण्यात येणार आहे. काल दि.१७ जून रोजी स्वराज्य जननी माता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या योजनेचा शुभारंभ संपन्न झाला.

कोरोना महामारीमुळे देशात हाहाकार पसरून अनेकांना एक वेळ जेवणही मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत आपण समाजासाठी काही तरी देणे लागतो या उद्देशाने मोशी प्रभाग क्र ०२ मधील गरजवंतांना श्री व सौ. आल्हाट यांनी मोफत किराणा साहित्य वाटपाचा केलेला संकल्प आदर्शवत आहे. त्यांच्या या कार्यास माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!

यावेळी माझ्या समवेत कामगार नेते इरफानभाई सय्यद, महिला आघाडी जिल्हा संघटिका सौ सुलभाताई उबाळे, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, विभाग प्रमुख विश्वनाथ टेमगिरे, शाखा प्रमुख काका बोराटे, युवासेना विभाग अधिकारी अमित आल्हाट, युवासेना अधिकारी ऋषिकेश बोराटे, जेष्ठ शिवसैनिक गुलाब आल्हाट, परमेश्वर आल्हाट, संकेत चावरे,तुषार आल्हाट, विनायक आल्हाट,मनोज आल्हाट, सुरेश बनकर, दिपक गवळी, भागवत, नितीन लगाडे तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.