लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

विरोधी पक्षनेते फडणवीस यांची आमदार महेश लांडगे यांना साथ : आमदार पडळकर

-चिखली येथील कार्यक्रमात आमदार पडळकर यांची फटकेबाजी

– म्हणाले…फडणवीस ज्याच्या पाठीशी त्याचे कोण वाकडे करू शकत नाही!

पिंपरी।लोकवार्ता-

भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे सच्चा माणूस आहे. गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा अशी या माणसाची राज्यभरात ओळख आहे. या सच्च्या माणसावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा विशेष जीव आहे. त्यामुळे राज्यात सत्ता नसली, तरी फडणवीस यांच्यासारखे नेतृत्व ज्यांच्या पाठीशी आहे, त्यांचे कोणीही वाकडे करू शकत नाही, अशी तुफान फटाकेबाजी विधान परीषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

चिखली येथे ‘फ’ प्रभाग अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त “चला-हवा-येऊ-द्या” कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमानिमित्त आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी महापौर राहुल जाधव, नगरसेविका साधना मुळेकर, स्वीनल म्हेत्रे, विकास डोळस, भाजप सरचिटणीस राजू दुर्गे, सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार, अंकुश मळेकर,  टायगर ग्रुपचे तानाजी जाधव,अनिकेत घुले, गोल्डन मॅन सनी वाघचौरे, तसेच आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पडळकर म्हणाले की, महेश लांडगे अतिशय भला माणूस आहे.  ते मनाने निर्मळ आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा चांगल्या मनाच्या माणसाशी कायम एकनिष्ठ रहायला हवे. जे  गोरगरीब आहेत. ज्यांची समाजात प्रतारणा होते. अशा माणसाच्या पाठीशी महेशदादा यांचे नेतृत्व कायम उभे असते. अशी त्यांची राज्यभरात ख्याती आहे. त्यामुळे राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते फडणवीस हे खंबीर पाठिंबा देऊन उभे आहेत. हे दोघेही इतके भले आणि सच्चे आहेत म्हणून माझा या दोघांवर विशेष जीव आहे.

यावेळी पडळकर यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणाशी एका व्यापाऱ्याने केलेला संकल्प याचे उदाहरण दिले. हा संकल्प तडीस नेण्यासाठी त्या व्यापाऱ्याने प्रसंगी आपला जीवही देण्याची तयारी दाखवली होती. असे सांगत त्यांनी आज आपल्याला महेश लांडगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा संकल्प करायचा आहे, असे सांगितले.

नगरसेवक कुंदन गायकवाड म्हणाले की , चिखलीसारख्या उपनगरीय भागांचे नेतृत्व करण्यासाठी महेश लांडगे यांनी संधी दिली. आम्ही त्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करत आहोत. या चार वर्षाच्या काळात महेश लांडगे यांनी सर्वतोपरी पाठिंबा दिला. आम्ही नवखे आहे, म्हणून कधीही हेटाळणी केली नाही. पदोपदी समजून घेण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाची पदे देखील दिली. उपनगर, ग्रामीण भाग असलेल्या समाविष्ट भागाला पहिले महापौर पद देण्याचा मानही आमदार लांडगे यांच्या मुळे मिळाला. त्यांनी नागरिकांच्या या भागाच्या गरजा ओळखल्या.  त्यामुळेच आम्ही या प्रभागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करू शकलो अशा भावना गायकवाड यांनी व्यक्त केल्या.


आम्ही शहरातच निर्णय घेतो: महेश लांडगे

पिंपरी-चिंचवड शहरात समाविष्ट असणाऱ्या उपनगर समजल्या जाणाऱ्या चिखली सारख्या भागाचा कायापालट आपल्याला गेल्या चार वर्षांत दिसून आला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आम्ही कुठलेही पद देताना शहराबाहेर जाऊन निर्णय घेत नाही. असे म्हणत आमदार महेश लांडगे यांनी विरोधकांना टोला लगावला. शहरातच, स्थानिक पातळीवर सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतो. त्यामुळे महत्त्वाची पदे देखील त्याच ताकदीच्या  माणसाला मिळतात आणि म्हणूनच शहराचा प्रभागाचा आणि स्थानिक भागांचा विकास झालेला दिसून येत आहे, असे आमदार महेश लांडगे यावेळी म्हणाले.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani