मे अखेरीस पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक आरक्षण सोडत
सकाळी अकरा वाजता प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पिंपरी । लोकवार्ता
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या अनुशंगाने महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या मंगळवारी निवडणुकीची आरक्षण सोडत काढली आहे. सकाळी अकरा वाजता या प्रक्रियेला सुरुवात होईल. आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला आणि सर्वसाधारण म्हणजेच ओपन कॅटेगिरीमध्ये मोडणाऱ्या आरक्षित जागांची सोडत काढली जाईल. प्राध्यापक रामकृष्ण गोरे प्रेक्षागृहात ही सोडत पार पडणार आहे. या सोडतीकडे इच्छुकांच लक्ष लगालय महापालिकेच्या आरक्षणासाठी सोडत काढण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगान दिल्या होत्या. त्यानुसार 31 मे रोजी ही निवडणूक सोडत काढली जाणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडत प्रक्रियेची रंगीत तालीमही केली जाणार आहे. तसंत संपूर्ण सोडतीचं इतिवृत्तही लहिलं जाईल. सोडतीचा कार्यक्रम हा महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये पार पडेल. सोडतीसाठी पारदर्शन ड्रम वापरण्यात घेणार आहेत. ड्रममध्ये टाकण्यात येणाऱ्या चिठ्यांचा आकार कमीतकमी ए-फोर साईजचा असेल. चिठ्ठी रोल करुन त्यावर रबर बॅन्ड लावण्यात तील. हे रबर बॅन्ड एकाच रंगाचे असावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. चिठ्ठीच्या मध्यभागी रबर बॅन्ड लावले जातील.