लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

चाकण एम.आय.डी.सी परिसरात बिबट्याचा वावर.. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण… !

चाकण एमआयडीसीतील मर्सिडीज बेंज कंपनीत बिबट्या घुसल्याचे -पहाटेच्या सुमारास कंपनीच्या सुरक्षारक्षकाला बिबट्या दिसल्यानंतर ही बाब समोर आली.

चाकण । लोकवार्ता-

पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस बिबट्याच्या वावर वाढत चालेला आहे. आधी गावात बिबट्या आढळल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. एवढंच नव्हे तर आंबेगाव, जुन्नर परिसरात अनेकदा बिबट्याने नागरिकांवर हल्लेही केले आहेत. मात्र आज पिंपरीतील चाकण एमआयडीसीत बिबट्या घुसल्याने खळबळ उडाली आहे. एमआय डीसीतील मर्सिडीज बेंज कंपनीत बिबट्या घुसल्याचे -पहाटेच्या सुमारास कंपनीच्या सुरक्षारक्षकाला बिबट्या दिसल्यानंतर ही बाब समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच वन्यधिकारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याला बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.

या सर्व घटनेची माहिती मिळताच कंपनीतील कामगारांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे. पहाटेच्या सुमारास कंपनी च्या सुरक्षारक्षकाला बिबट्या दिसल्यानंतर ही बाब समोर आली.मात्र हा बिबट्या कंपनी आवारात कुठून आणि कसा आला हे अद्याप समजू शकलेलं नाही. बिबट्याला पकडण्यासाठी कंपनीत पिंजराही बसवण्यात आला आहे. वन सद्यस्थितीला बिबट्या मर्सिडीज बेंज कंपनीमधील बॉडी शॉप मध्ये असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.वन विभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani