लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या-डॉ. कैलास कदम

-शहर कॉंग्रेसची समन्वय बैठक मोशी प्राधिकरण येथे संपन्न

पिंपरी | लोकवार्ता-

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकांना सामोरे जात असताना कॉंग्रेसचे सर्व आजी – माजी नगरसेवक, आजी – माजी पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ व युवक कार्यकर्ते, महिला पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच शहर कॉंग्रेसच्या पदाधिका-यांची निवड नियुक्ती करण्याचे नियोजन आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर कॉंग्रेसचा झेंडा फडकाविण्याचे ध्येय ठेवून पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.

रविवारी (दि. 12 डिसेंबर) शहर कॉंग्रेसची समन्वय बैठक डॉ. कैलास कदम यांच्या अध्यक्षतेखाली मोशी प्राधिकरण येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रदेश कॉंग्रेसचे सचिव गौतम आरकडे, माजी महापौर कविचंद भाट, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष डॅा. पी. बी. कुंभार, महाराष्ट्र प्रदेश पर्यावरण सेलचे अध्यक्ष अशोक मोरे, ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, शामला सोनवणे, शहर युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, काँग्रेस सेवा दलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, एनएसयुआयचे माजी प्रदेश अध्यक्ष मनोज कांबळे, उपाध्यक्ष उमेश खंदारे, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, अख्तर चौधरी, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र सिंह वालिया, एनएसयूआयचे शहराध्यक्ष डॉ. वसीम इनामदार, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहितुले, महिला नेत्या छायाताई देसले, नंदाताई तुळसे, शोभा पगारे, कमला श्रोत्री, ज्येष्ठ नागरिक सेलचे माजी अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, सुनिल राऊत, अबूबक्र लांडगे, मल्याळी समाज नेते के. एम. रॉय, के. हरी नारायणन, विश्वनाथ जगताप, आनंदराव फडतरे, आदम पटेल, शब्बीर इनामदार, इरफान शेख, याकूब इनामदार, बाबा बनसोडे, हिराचंद जाधव, निखिल भोईर, ज्ञानेश्वर मलशेट्टी, आबा खराडे, सतिश भोसले, किरण नढे, इस्माईल संगम, नयन पालांडे, रवी नांगरे, प्रकाश पठारे, किरण खाजेकर, प्रा. संजय पवार, वामन ऐनिले, अमर नाणेकर, अक्षय शहरकर आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. कैलास कदम म्हणाले की, मागील पाच वर्षांतील महानगरपालिकेतील भाजपाच्या भ्रष्ट कारभारावर सर्व सामान्य जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे. या नाराजीचा उद्रेक मतदार मतपेटीतून व्यक्त करतील. यासाठी आपण सर्वांनी कॉंग्रेसची ध्येय धोरणे मतदारांपुढे घेऊन जाऊ. शेतक-यांनी एकजुटीने ज्या प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाहीला पायबंद घालण्यासाठी वर्षभर आंदोलन करुन पंतप्रधानांना माघार घेण्यास भाग पाडले. त्याच प्रमाणे आपण सर्वजण एकजूटीने महानगरपालिकेतील भाजपाची सत्ता उलथून टाकू. या निवडणूकीत कोणाबरोबर आघाडी करायचे ते वरिष्ठ ठरवतील. कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी काम करावे. कॉंग्रेस पक्ष नेहमीच उपेक्षित, वंचित समाज आणि सर्व जाती धर्मातील नागरीकांना न्याय देणारा पक्ष आहे. भाजपाच्या चुकीच्या धोरणामुळे समाजातील सर्व घटक त्रस्त आहेत. आता कॉंग्रेसला पक्ष वाढीसाठी अनुकूल वातावरण आहे असेही डॉ. कैलास कदम म्हणाले.

आगामी निवडणूकीसाठी इच्छुक असणा-या कार्यकर्त्यांनी आपली नावे द्यावीत, कार्य अहवाल द्यावा तसेच निवडणूक विभागाने तयार केलेल्या प्रभाग रचना आराखड्यावर योग्य वेळी आक्षेप, हरकती घ्याव्यात असेही या बैठकीत ठरले. प्रदेश कॉंग्रेसचे सचिव गौतम आरकडे म्हणाले की, डॉ. कैलास कदम यांच्या माध्यमातून शहराला सर्वसमावेशक नेतृत्व मिळाले आहे. त्यांच्या नियुक्तीपासून पक्ष संघटनेत नवचैतन्य आले आहे. शहर कार्यकारिणी करताना सर्व जाती धर्मातील, ज्येष्ठ, महिला, युवक, युवतींना, कामगारांना संधी देण्यात येईल.

नरेंद्र बनसोडे, विश्वास गजरमल, मनोज कांबळे, वसिम इनामदार, शामला सोनवणे, निगार बारसकर, कविचंद भाट आदींसह या बैठकीत सर्व उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचालन अभिमन्यू दहितुले आणि आभार उमेश बनसोडे यांनी मानले.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani